Sunday, January 4, 2009

तू फक्त एकदाच हो म्हण...
तू फक्त एकदाच हो म्हण...
मग हे दिवस जातील,
जणू एक-एक सण.
ह्या रात्री राहतील,
ह्या दिवसांची आठवण.
तू फक्त एकदाच हो म्हण...

ह्या मौजमजेचा लाटांवर,
मज दूर कुठेतरी घेउन चल.
मग त्या आठवणीन्च्या वाळऊवर ,
मी एक, तू एक पाउल उचल.
वाईट आठवणीन्साठी खड्डा खण,
ए! फक्त एकदाच हो म्हण...



त्या वालूवरच्या पाउलान्च्या खुणा,
परत आणतील तो वसंत जुना.
वसंत तुझा नी माझा,
राहिल स्मरणात ताजा.
राहिल जवळ ह्या वाळ+उतिल प्रत्येक कण.
अग फक्त एकदाच हो म्हण...

ह्या वालुवर बघतोय तुझी वाट.
ये संध्याकाळच्या आत.
तुझ्याविना राहवेना,
तुझ्याविना करमेना.
तुही कधी हेच म्हण,
मला फक्त एकदाच हो म्हण…

…प्रणव